
दापोली : सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल यंदा शंभर टक्के लागला असून विद्यालयाने यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यालयातून दहावी परीक्षेसाठी एकूण ६३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गुणवंत विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले आहे. यामध्ये मैथिली मुकेश महाडिक हिने ८८.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अनुज अनिल देवघरकर याने ८६.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. अमृता वसंत गायकवाड हिने ८४.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला, तर मंथन नरेश सरकरे याने ८४.२० टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.
विद्यालयातून प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश राऊत तसेच शिक्षक नझिर मुसा, पांडुरंग शिंदे, समीर भोसले आणि भरत गोताड यांनी मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, संचालक शांताराम खानविलकर, शालेय समितीचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, अशोक जाधव, विजयकुमार खोत तसेच सरपंच पूर्वा सकपाळ यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले.




