
संगलट (खेड) प्रतिनिधी :
खेड तालुक्यातील नामांकित एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या निकालात संगलट गावातील होतकरू विद्यार्थी कुमार हुजैफा फैसल जमादार यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा आणि गावाचा नावलौकिक उंचावला आहे.
हुजैफा जमादार यांनी दहावी परीक्षेत 76.40 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण संगलट गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हुजैफा हे संगलट येथील ज्येष्ठ पत्रकार इक्बाल जमादार यांचे नातू असून, त्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबीयांचा पाठिंबा आणि आजोबांची प्रेरणा महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले.
एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलने यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. हुजैफा यांच्या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हुजैफा जमादार यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.




