कोळकेवाडी-कुंभारवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह; भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले

सांस्कृतिक कार्यक्रम / भजनी भारूड: “तरुण मंडळाचे भजनी भारूड आणि नमन, अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांस्कृतिक रंगत वाढवत आहेत.

भजन मंडळ / गायक:
“नामवंत गायक व भजन मंडळाचे सादरीकरण, भक्तांचा उत्साह वाढवत”

चिपळूण, प्रतिनिधी:

रत्नागिरी जिल्ह्यातील ता. चिपळूण येथील कोळकेवाडी (कुंभारवाडी) येथील श्री हनुमान मंदिरात वै. गुरुवर्य भिकाजी महाराज शिंदे, वै. गुरुवर्य रामचंद्र महाराज साळवी आणि वै. गणपत सावरटकर यांच्या कृपा छत्राखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील पन्नास वर्षांपासून चालत आलेल्या या सप्ताहाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पंचक्रोशी परिसरात धार्मिक व भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. सप्ताहाची सुरुवात विविध धार्मिक विधींनी होते, आणि दररोज सकाळी काकडा आरती, सायंकाळी हरिपाठ व प्रवचन, तसेच रात्रौ नामवंत कीर्तनकारांचे हरीकीर्तन आयोजित केले जाते.

या वर्षी अनेक मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार आणि भजन मंडळे सहभागी होत असून भक्तांना अध्यात्मिक मार्गदर्शन मिळत आहे. दर वर्षी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात येते, आणि या वर्षी गावातील ग्रामस्थ, संत आणि भक्तजण स्व:ईच्छेने महाप्रसाद देणार आहेत.

सप्ताहात संध्याकाळी हरिपाठ, कीर्तन आणि भजन आयोजित आहेत. तसेच तरुण मंडळाचे भजनी भारूड व नमन, प्रापंचिक आख्यान तसेच मराठी गाण्यांचा विशेष कार्यक्रम प्रा. राजेंद्र साळवी व मित्र परिवाराद्वारे सादर केला जाणार आहे.

विशेष म्हणजे, गुरुवार, २ एप्रिल २०२६ रोजी पहाटे श्री हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार असून, अरुण महाराज कुंभार यांच्या कीर्तनासह विशेष पूजा विधी आयोजित करण्यात आले आहेत.

अखंड हरिनाम सप्ताहात खालील नामवंत उपस्थित राहणार आहेत:

हरिकीर्तन: श्री. काशिनाथ महाराज कदम, सौ. श्रद्धा ताई पाथरे, श्री. दिपक महाराज साळवी, श्री. राजाराम महाराज गाडे, श्री. जय महाराज तुळसणकर, सौ. मुक्तताई आखाडे, श्री. मनीष महाराज चव्हाण, श्री. राजेंद्र महाराज भुवड

अध्यात्मिक प्रवचन: श्री. सिताराम महाराज सावरटकर, श्री. बजरंग महाराज, श्री. चंद्रकांत महाराज मांडवकर, श्री. आदिनाथ महाराज खापरे, श्री. सुरेश महाराज देवरुखकर, श्री. सुरज महाराज टेरवकर

संगीत व भजन: अनेक नामवंत गायक, मृदंगमणी

धार्मिक सप्ताहामुळे परिसरात भक्ती, एकता आणि सांस्कृतिक जाणीवा वृद्धिंगत होत असून आयोजकांनी सर्व भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

  • Related Posts

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    वाचायला विसरू नका

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम