
दापोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर बौद्धजन सेवा संघ दापोली–मंडणगड आणि JCI दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असून दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत पार पडणार आहे.
🏥 सहभागी संस्था व सेवा
1) नेत्रसेवा उपक्रम
नव चिपळूण नेत्रसेवा उपक्रम
मोफत नेत्र तपासणी
मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया मार्गदर्शन
मोफत औषध वाटप
मार्गदर्शन : श्री. संदीप नलावडे (विकास अधिकारी)
2) सर्वसाधारण आरोग्य तपासणी
शितल फाउंडेशन / अभिनंदन व्हेंचर
सर्वसाधारण आरोग्य तपासणी
रुग्ण सल्ला व औषध वाटप
समन्वय : श्री. सुरज जाधव (को-ऑर्डिनेटर), डॉ. फरहाना सय्यद
3) महिला आरोग्य मार्गदर्शन
माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट
मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन
मोफत कापडी सॅनिटरी पॅड वाटप (बौद्धजन सेवा संघातर्फे)
सहभाग : सुनिल देसाई, सौ. निशा सावंत
4) व्यसनमुक्ती मार्गदर्शन
ब्रह्माकुमारीज
समुपदेशन व व्यसनमुक्ती मार्गदर्शन
सहभाग : बी.के. सरिका बहनजी, बी.के. विद्या बहनजी
👨⚕️ उपस्थित वैद्यकीय तज्ञ (Doctors Panel)
डॉ. कुणाल मेहता (MBBS, MS)
डॉ. पवन सावंत
डॉ. तुषार भागवत (MS)
डॉ. सुयोग भागवत (MBBS, MD)
डॉ. अनिल काकडे
डॉ. अमित वीरकर
डॉ. पियुष सोनजे
डॉ. ओंकार बागडे
इतर मान्यवर डॉक्टर उपस्थित राहणार आहेत
👉 शिबिरादरम्यान सोनोग्राफीची गरज भासल्यास डॉ. समीक्षा कुणाल मेहता यांच्या निदान केंद्रात २०% सवलत देण्यात येणार आहे.
📍 शिबिर स्थळ
चिंतामणी कॉम्प्लेक्स टेरेस, चिपळूण नागरी पतसंस्थेजवळ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर, केळसकर नाका, दापोली.
📞 संपर्क
आयु. शरद जाधव – 9405970734 / 7898235550
आयु. प्रीतम रूके – 7588933555
जेसी कुणाल मंडलिक – 9028666901
🧾 आवाहन
ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांकडून करण्यात आले आहे.





