दापोली (प्रतिनिधी):
१० वी आणि १२ वीच्या परीक्षेचे निकाल लवकरच जाहीर होणार असून, पुढील भविष्यासाठी नेमकी कोणती दिशा निवडावी, या विवंचनेत विद्यार्थी आणि पालक आहेत. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि त्यांना उज्ज्वल भविष्याची वाट दाखवण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन, ता. दापोली यांच्या वतीने आज, रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी विशेष ‘करिअर गायडन्स सेमिनार २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे तपशील:
वेळ: सकाळी १०.३० वाजता
स्थळ: पेन्शनर्स हॉल, दापोली.
विषय: “उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा”
तज्ज्ञ मार्गदर्शकांचा लाभ:
या सेमिनारमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये आद. गमरे सर (मुख्याध्यापक, N.K.V. मुरुड), आद. संदे सर (करिअर समुपदेशक), आद. उत्कर्षा मॅडम (प्रा. N.K.V. महाविद्यालय) आणि आद. प्रथमेश जाधव (कलाकार, लेखक, दिग्दर्शक) हे उपस्थित राहून करिअरच्या विविध संधींबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत.
कार्यक्रमाचे स्वरूप:
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.४५ वाजता प्रतिमापूजन आणि स्वागताने होईल. त्यानंतर ११ वाजता मान्यवरांचे मार्गदर्शन सुरू होईल. दुपारी २ वाजता अध्यक्षीय मनोगत आणि अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आयू. सुरज पवार (संघटक, स.वि.आं. दापोली) भूषविणार आहेत.
प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्याला मान. अतिष घाडगे, मान. सुरेश मोरे, मान. अनंत जाधव, मान. नितीन जाधव, मान. अनिल घाडगे आणि मान. अशोक जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
”१० वी आणि १२ वी नंतर पुढे काय?” या प्रश्नाने गोंधळून न जाता विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सम्यक विद्यार्थी आंदोलन, ता. दापोली यांच्या वतीने निमंत्रक आणि आयोजकांनी केले आहे.
विद्या वंदा न्यूज – नेहमी

📍 ठिकाण: पेन्शनर्स हॉल, दापोली
⏰ वेळ: सकाळी १०:३० वाजता
आपल्या सोबत.





