पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल तर अमेरिकेसोबतचा ट्रेड करार रद्द करून दाखवावा; राहुल गांधींचे भोपाळमधून थेट आव्हान

नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आयोजित ‘किसान महा-चौपाल’मध्ये बोलताना राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापार करार (Trade Deal) आणि चीनसोबतच्या सीमा वादाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. “पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी अमेरिकेसोबत झालेला हा अन्यायकारक व्यापार करार रद्द करून दाखवावा,” असे जाहीर आव्हान त्यांनी यावेळी दिले.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात आरोप केला की, भारत आणि अमेरिका यांच्यातील हा करार गेल्या चार महिन्यांपासून रखडला होता, कारण भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्राचे हित धोक्यात होते. मात्र, माझ्या संसदेतील भाषणानंतर घाबरलेल्या पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळाची परवानगी न घेता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला आणि हा करार निश्चित केला. या करारामुळे भारतीय कापूस, सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून, हा देशहिताशी केलेला मोठा विश्वासघात आहे, अशी टीका त्यांनी केली.

सीमा वादावर भाष्य करताना राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला. चीनचे रणगाडे भारतीय हद्दीत घुसलेले असताना लष्करप्रमुखांना दिल्लीतून कोणतेही स्पष्ट आदेश मिळत नव्हते. पंतप्रधान मोदींनी त्या संकटाच्या काळात लष्कराला एकटे सोडले आणि चीनच्या घुसखोरीवर आजही ते मौन बाळगून आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. संसदेत जेव्हा मी हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला बोलण्यापासून रोखण्यात आले, असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदी ‘कॉम्प्रोमाईज्ड’ (तडजोड केलेले) नेते आहेत आणि ते पुन्हा एकदा अमेरिकेसमोर शरणागती पत्करतील, असा दावा राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबाबत दिलेल्या निर्णयानंतर आता भारताने आपली भूमिका ठामपणे मांडायला हवी, परंतु हे सरकार केवळ मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या हितासाठी काम करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Related Posts

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

दापोली तालुक्यातील तेरवायंगणी येथील कै. कमलाकर जनार्दन तथा भाई जावकर विद्यालयाने एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२६ मध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम