पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार; अडूर गावात हजारो भाविकांची उपस्थिती

श्री सुंकाई देवी होलिकोत्सवातील संकासुराचा थरार

अडूर (ता. गुहागर) येथे पारंपरिक संकासुर सोहळ्याचा थरार अनुभवताना भाविक.गुहागर : कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाच्या निमित्ताने तालुक्यातील अडूर गावात ग्रामदेवता श्री सुंकाई देवी मंदिर यांच्या होलिकोत्सवातील पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. श्रद्धा, धैर्य आणि लोकपरंपरेचे अनोखे दर्शन घडविणारा हा सोहळा पाहण्यासाठी जिल्हा व परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते.

फाल्गुन पंचमीपासून सुरू झालेल्या या उत्सवात चतुःसीमेतील कोंडकारूळ, बोऱ्या, बुधल, पालशेत व नागझरी या गावांमध्ये देवीच्या खेळ्यांची भोवनी पार पडली. त्यानंतर भाटी मैदानावर आयोजित धार्मिक कार्यक्रमात संकासुराने पेटत्या होमाभोवती प्रदक्षिणा घालत भक्तांचा पाठलाग करण्याची पारंपरिक प्रथा सादर केली. होमाला अग्नी दिल्यानंतर संकासुराने ज्वलंत निखाऱ्यांतून धावत उपस्थितांमध्ये थरार निर्माण केला.

या वेळी ‘जय देवी सुंकाई’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. संकासुराला चिडवणाऱ्या भक्तांचा तो पेटत्या होमातून पाठलाग करतो आणि पकडल्यावर भक्त त्याचा नमस्कार करून आशीर्वाद घेतात, अशी आगळीवेगळी परंपरा पाहण्यासाठी मुंबई, पुणे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर ते मंडणगड परिसरातूनही अनेक भाविक आणि युट्यूबर्स उपस्थित होते.

पिढ्यान् पिढ्या सुरू असलेल्या या परंपरेत आजवर कोणतीही अपघाताची घटना घडलेली नसल्याने ग्रामदेवतेवरील श्रद्धा अधिक दृढ होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संकासुराचा पारंपरिक वेश, कंबरेतील घुंगरांचा नाद आणि मृदुंग-चकव्याच्या तालावर सादर होणारी लोककला यामुळे कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण लाभले.

यंदा या सोहळ्याची माहिती सोशल मीडियासह विविध माध्यमांत प्रसिद्ध झाल्याने विक्रमी गर्दी झाली. वाढलेल्या वाहनसंख्येमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली, तर मोबाईल नेटवर्कवर ताण आल्याने इंटरनेट सेवा काही काळासाठी ठप्प झाली. काही भाविकांना प्रचंड गर्दीमुळे प्रत्यक्ष संकासुराचा थरार अनुभवता आला नाही.

श्रद्धा, परंपरा आणि सामुदायिक एकोप्याचे प्रतीक असलेला पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा हा अनोखा सोहळा यंदाही भक्तिरंगात आणि दिमाखात संपन्न झाला.

  • Related Posts

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    वाचायला विसरू नका

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम