धोपावे ग्रामविकास मंडळ , मुंबई (रजि.) मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा, विद्यार्थी गुणगौरव व महिला गौरव सोहळा संपन्न.

धोपावे ग्रामविकास मंडळाच्या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करतानाचा क्षण

छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना मान्यवर.दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४:००वाजता मंडळाचे *सन्माननीय अध्यक्ष श्री.अनिल लक्ष्मण चव्हाण* यांच्या अध्यक्षतेखाली आणि *धोपावे श्री.हनुमान मंदिर विश्वस्त अध्यक्ष माननीय श्री.विलास यशवंत निंबकर* यांच्या उपस्थितीत कृष्णा जैजुरकर क्लासेस, पर्ल सेनापती बापट मार्ग दादर ( पश्चिम ) येथे संपन्न झाली.

सुरुवातीला मान्यवर *मा.श्री.विलासजी निंबकर,मा.श्री.अनिलजी चव्हाण,मा.श्री.वामनजी पवार,मा.श्री.प्रकाश डावळ* यांच्या कडुन *छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून , दिपप्रज्वलन करण्यात आले.आणि मान्यवरांचे *स्वागत गित* लावुन सभेला सुरुवात झाली.मंडळाचे सरचिटणीस *श्री.अनिल गोविंद भुवड* यांनी दि.२४ एप्रिल २०२४ वार्षिक सर्वसाधारण सभा, गावपातळीवर हनुमान मंदिर जीर्णोद्धार निधी संदर्भातील सभा आणि आवक,जावक पत्राचे वाचन केले.यथोचित मान्यवर आणि गावातील जेष्ठ नागरिक, आणि महिला यांचा पुष्पगुच्छ, शाळ देऊन सन्मान करण्यात आला. *श्री.अंकुश नाटेकर ( महाराष्ट्र पोलीस) श्री.प्रमोद सावंत, श्री.राजेश सावंत, श्री.किशोर पवार,सौ.स्नेहल कुळे,सौ.कविता सावंत,सौ.ईशा भेकरे* इत्यादी कार्यकत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मंडळाचे खजिनदार *श्री.प्रकाश महादेव डावळ* यांनी जमा/खर्च अहवाल सादर केला. धोपावे ग्रामविकास मंडळ मुंबई रजि मंडळासाठी योगदान देणारे *मा.श्री.मनोज पवार , मा.श्री.सुनिल कुळे , मा.श्री.प्रमोद सावंत , मा.श्री.विनय कुळे , मे. के.के.फॅशन वर्ल्ड ग्रुप* यांचा *”सन्मानपत्र”* आणि *”सन्मानचिन्ह”* देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

*विद्यार्थी गुणगौरव सोहळा निमित्ताने कु.पार्थ लहु नाटेकर – एस.एस.सी. ८६.२०%, कु.तन्वी अनिल भुवड – एच.एस.सी.६५%, श्री.अंकुश गोविंद नाटेकर – ( महाराष्ट्र पोलीस) , सौ.ईशा ईतेश भेकरे – कुपर रुग्णालय ( परिचारिका ), सौ.भाग्यश्री मंगेश भुवड – सुर्या हॉस्पिटल ( परिचारिका ), डॉक्टर श्री.वैभव राजन दळी (MBBS ), कु.विराज सुनिल कुळे – सायन्स फॅस्टीवल, कु.मनाली महेश शिगवण – अधिवक्ता, श्री.लक्ष्मण गंगाराम भेकरे – अधिवक्ता, कु.पुजा नरेश कुळे -बी.फार्मसि, कु.मयुरी प्रविण कुळे- एम.कॉम, अक्षता अरुण भुवड -एम.कॉम, कु.भावेश राजेश सावंत -एच.एस.सी.( क्रिकेट सिझन बॉल ) कु.मेहक अल्ताफ खान -एच.एस.सी.७४.५०% प्राजक्ता अरुण सावंत- एम.एस.सी.( विज्ञान पारंगत ), सायली अरुण सावंत – एम,एस,सी. ( विज्ञान पारंगत ), कु.यशिका अनिल कुळे( बेसिक संगणक), कु.नागेश प्रमोद सावंत ( बॉडी बिल्डर ) कु.रुतुजा महेश चव्हाण,१५ वी* यांचा भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

*श्री.अंकुश नाटेकर* यांनी आपले मनोगत व्यक्त करताना धोपावे ग्रामविकास मंडळ मुंबई चांगले काम करीत आहे.या मंडळातील कार्यकर्ते प्रामाणिक गावाची सेवा करीत आहेत.मी स्पष्टच बोलतोय गावात राजकारण खुपच चाललंय गावात एखादी योजना राबवली जाते त्यावर राजकारण चालू होते त्यामुळे गावाचा विकास होत नाही.ही वस्तुस्थिती आहे.महाभारतातील उदाहरणे देऊन सभासंदांची मनं जिंकली. मंडळाने १२०/- वार्षिक सभासद वर्गणी ठेवली आहे.ती फारच कमी असुन वाढवावी लागेल असा मोलाचा सल्ला दिला.मला वेळ भेटेल त्यावेळी मी आर्वजुन मंडळाच्या उपक्रमात सहभागी होईल असे सांगितले.

*श्री.राजेश सावंत-* मंडळाची वर्षातुन दोन सभा असायला हव्यात गणपती मध्ये गावपातळीवर एक सभा व्हावी असे सुचविले.

*श्री.विलासजी निंबकर -* यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माझ्या वडीलांनी गावातील पहीली शाळा हनुमान मंदिरात चालू केली.सर्वांना प्रवेश होता.कुठलाही भेदभाव नव्हता. *”आमराई”* नाटक झालं त्यावेळी कलाकार गावातीलच होते.धोपावे ग्रामविकास मंडळाने चांगल्या प्रकारे जीर्णोद्धार निधी साठी प्रयत्न केला त्याबद्दल शतशः आभार मानले.माझ्या वडीलांनी जसं जपलं , त्याप्रमाणेच मी ही प्रत्येक वाडीत सलोख्याचे संबंध आहेत.आताही सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.राजकारण ठेवा बाजुला सर्वांनी एकत्र या असे आवाहन करुन मंडळाला शुभेच्छा दिल्या.

*धोपावे ग्रामविकास महिला मंडळ* ची स्थापना करण्यात आली.त्यावेळी *अध्यक्ष सौ.कविता राजेश सावंत, सेक्रेटरी सौ.स्नेहल सुनिल कुळे, खजिनदार सौ.इशा इतेश भेकरे* यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

*नवनिर्वाचित महीलांनी आपले मनोगत व्यक्त केले.*

त्यानंतर *पैठणीचा खेळ रंगला* लकी ड्रॉ पद्धतीने दोन पैठणी ठेवण्यात आल्या होत्या. *प्रथम क्रमांक : सौ.शुंभागी मनोज पवार* यांनी बाजी मारली, तर *द्वितीय क्रमांक : सौ.अमिषा अनिल भुवड* यांनी पटकावला.

*धोपावे ग्रामविकास मंडळ ( मुंबई) रजि.मंडळाची नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.*

*कार्याध्यक्ष -श्री.प्रमोद शांताराम सावंत.*

*अध्यक्ष -श्री.अनिल लक्ष्मण चव्हाण*

*उपाध्यक्ष – श्री.मनोज शांताराम पवार*

*उपाध्यक्ष -श्री.कृष्णा शांताराम कुळे*

*सरचिटणीस -श्री.अनिल गोविंद भुवड*

*सहचिटणीस -श्री.किशोर शंकर पवार*

*सहचिटणीस -श्री.विनय कृष्णा कुळे*

*खजिनदार -श्री.सुनिल प्रकाश कुळे*

*सहखजिनदार – श्री.संतोष बाळु वरवेलकर*

*कार्यकारणी सदस्य*

श्री. संदिप चाळके

श्री.वामन पवार

श्री.बलवंत पवार

श्री.लवु पवार

श्री.प्रकाश डावळ

कु.प्रथमेश टेमकर

श्री.सुनिल डावळ

श्री.चंद्रकांत कुळे

श्री.सुरेश कुळे

श्री.राजेश सावंत

श्री.अनिल शिंदे

श्री.विजय सावंत

श्री.भुषण गुरव

श्री.भालचंद्र निमकर

श्री.अंकुश नाटेकर

श्री.निकेश जाधव

श्री.लक्ष्मण भेकरे

*यांची एकमताने निवड करण्यात आली.*

*श्री.अरुण सावंत* यांनी धोपावे ग्रामविकास मंडळाला पाठविण्यात आलेले पत्र विषय काटेरी झाडं, करवंदी सपाट करुन कांजु ,आंबा, कोकण फणस लागवड करणे. हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण होईल.जागा मोकळी होईल.झांडाची लागवड होईल इत्यादी

 

*अध्यक्षीय भाषणात माननिय श्री.अनिल लक्ष्मण चव्हाण* यांनी आम्हांला विश्वासाने परत अध्यक्ष पदावर घेतलं आहे त्यामुळे मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.आज मिटींगला उपस्थित राहील्या बद्दल तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.गावात सर्वांना सोबत घेऊन काम करु, गावात योजना चालू आहेत, पाणी,रस्ता त्याबद्दल संबंधित अधिकारी, मंत्री यांच्या कडे पाठपुरावा करु.आपण सर्वांनी सहकार्य करा.पुढील वर्षी महिला मंडळाचा विशेष हळदीकुंकू समारंभ आयोजित करु,आपले कायदे अधिकार यावर माहीती देण्यासाठी “चर्चा सत्र” ठेऊ.गावातील ग्रामपंचायत , जेष्ठ नागरिक यांच्या कडे समन्वय साधून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु.सर्वांनी सहकार्य करा असे भावनिक आवाहन करुन भाषण पुर्ण केले.

 

धोपावे ग्रामविकास मंडळ मुंबई रजि मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि महिला सन्मान या सभेचे सुत्रसंचलन श्री.अनिल गोविंद भुवड* यांनी केले.शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करुन अध्यक्षांच्या परवानगीने सभा सायंकाळी ७:३० राष्ट्रगीत बोलुन सभा समाप्त करण्यात आली.

  • Related Posts

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    वाचायला विसरू नका

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम