स्त्रीशक्तीचा गौरव! सुसंगत फौंडेशनतर्फे ३० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; डॉ. सुवर्णा कराड यांना विशेष गौरव

पुणे :

पुण्यात सुसंगत फौंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; डॉ. सुवर्णा कराड यांना विशेष गौरव.
पुण्यात सुसंगत फौंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; डॉ. सुवर्णा कराड यांना विशेष गौरव.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा गौरव करणारा प्रेरणादायी सोहळा पुण्यात उत्साहात पार पडला. सुसंगत फौंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. पुण्यातील वेदशास्त्रोत्तेजक सभागृहात रविवारी (दि. ८) हा भव्य सोहळा पार पडला.

कार्यक्रमात मराठी व इंग्रजी साहित्याच्या अभ्यासक डॉ. उज्ज्वला दीक्षित आणि प्रसिद्ध युवा कौन्सिलर डॉ. पल्लवी प्रसाद यांच्या हस्ते वैद्यकीय, सामाजिक, प्रशासन, उद्योग, व्यवसाय, गायन, संगणक तंत्रज्ञान, विधी आणि अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ३० महिलांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.

यासोबतच समाजातील वंचित घटकातील ३० महिलांना साडी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची विशेष जोड मिळाली.

याच कार्यक्रमात वंजारी महासंघ महिला आघाडी, महाराष्ट्रच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. सुवर्णा कराड यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याचा उपस्थितांनी गौरव केला.

कार्यक्रमाला सुसंगत फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुधाकर न्हाळदे, सचिव संगीता न्हाळदे, विश्वस्त धोंडीराम गडदे, डॉ. राम पडळकर, तसेच डॉ. संयोगिता नाईक, जयंत जोगळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. उज्ज्वला दीक्षित यांनी महाभारत व पुराणग्रंथातील गांधारी, कुंती, द्रौपदी, सती सावित्री यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रीव्यक्तीरेखांचा उल्लेख करत आजच्या महिलांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची गरज व्यक्त केली.

पुरस्काराला उत्तर देताना उद्योजिका श्रद्धा शैलेश शिंदे यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासाची कहाणी सांगितली. एका साध्या वडापाव गाडीपासून सुरू झालेला व्यवसाय आज ‘सह्याद्री फुड्स’ या ब्रँडद्वारे अनेक शाखांपर्यंत पोहोचला असल्याचे त्यांनी सांगितले. व्यवसायातील प्रामाणिकता, सातत्य आणि पतीची खंबीर साथ यामुळेच हा प्रवास शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधाकर न्हाळदे यांनी केले. अध्यक्षीय समारोप डॉ. पल्लवी प्रसाद यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली लेणे यांनी केले, तर कु. समृद्धी आदलिंगे यांनी आभार प्रदर्शन केले.

  • Related Posts

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    वाचायला विसरू नका

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम