गुहागर पंचायत समिती सभापतीपदी प्रणव पोळेकर, उपसभापतीपदी निलेश सुर्वे बिनविरोध

गुहागर पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रणव पोळेकर व उपसभापतीपदी निलेश सुर्वे यांची बिनविरोध निवड झाल्याचा प्रसंग.
गुहागर पंचायत समिती सभापतीपदी प्रणव पोळेकर तर उपसभापतीपदी निलेश सुर्वे यांची बिनविरोध निवड.

गुहागर (प्रतिनिधी – मंगेश जाधव) : गुहागर पंचायत समिती निवडणुकीनंतर भाजप–शिवसेना युतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर सभापती व उपसभापतीपदी कोणाची निवड होणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. अखेर शिवसेनेकडून प्रणव पोळेकर यांची सभापतीपदी तर भाजपकडून निलेश सुर्वे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

गुहागर पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने लढविलेल्या ६ जागांपैकी ५ जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपने लढविलेल्या ४ पैकी सर्व ४ जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे युतीच्या समीकरणानुसार सभापतीपद शिवसेनेकडे आणि उपसभापतीपद भाजपकडे जाणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र या पदांवर नेमके कोण विराजमान होणार याबाबत विविध तर्क-वितर्क रंगले होते.

अखेर शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय प्रणव पोळेकर यांच्या नावाची सभापतीपदासाठी अधिकृत घोषणा करण्यात आली. तर उपसभापतीपदासाठी भाजपकडून माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे विश्वासू सहकारी निलेश सुर्वे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

या निवडीच्या वेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, नवनियुक्त पंचायत समिती सदस्य तसेच शिवसेना-भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील यांनी निवडणूक अधिकारी म्हणून पार पाडली.

नवनियुक्त सभापती व उपसभापतींचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, गुहागर तालुक्याच्या विकासासाठी दोघेही प्रभावी काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Posts

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम