तळवली भेळेवाडीमध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने प्रथमच जागतिक महिला दिन उत्साहात साजरा 

तळवली भेळेवाडी येथे रंगपंचमी व जागतिक महिला दिनानिमित्त सुकाई देवी पालखी सोहळा आणि महिलांचा सन्मान कार्यक्रम.
तळवली भेळेवाडी येथे रंगपंचमी आणि जागतिक महिला दिनानिमित्त सुकाई देवी पालखी सोहळा व महिलांचा सन्मान उत्साहात साजरा.

गुहागर (प्रतिनिधी – मंगेश जाधव): गुहागर तालुक्यातील तळवली येथील भेळेवाडीमध्ये ग्रामदेवता आई श्री सुकाई देवी यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रंगपंचमी तसेच जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाडीतील ग्रामस्थांनी प्रथमच एकत्र येत हा उपक्रम आयोजित केल्याने कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.

रंगपंचमीच्या निमित्ताने ग्रामदेवता श्री सुकाई देवी यांची पालखी वाडीतील प्रत्येक घरी नेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पारंपरिक पद्धतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी नाचवत व रंगांची उधळण करत ग्रामस्थांनी रंगपंचमी जल्लोषात साजरी केली.

रात्री उशिरा वाडीतील तसेच उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांचे कुटुंब व समाजातील महत्त्व, त्यांचा सन्मान आणि आदर राखण्याची गरज याविषयी मार्गदर्शनपर विचार मांडण्यात आले. महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने अंगणवाडी ते नववीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वाडीतील पदवीधर तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना प्रेरणा दिली.

हा संपूर्ण कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भेळेवाडीतील ग्रामस्थ व महिला मंडळींनी मोलाचे सहकार्य केले.

Related Posts

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम