दापोलीत वंचित बहुजन आघाडीची जनरल सभा संपन्न; नवीन तालुका कार्यकारणी जाहीर

  1. दापोली येथे वंचित बहुजन आघाडीच्या जनरल सभेत नवीन तालुका कार्यकारणी जाहीर करताना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित.
    दापोली येथे वंचित बहुजन आघाडीची जनरल सभा; अतिश घाडगे तालुका अध्यक्षपदी, नवीन कार्यकारणी जाहीर.

    दापोली (प्रतिनिधी): वंचित बहुजन आघाडी, तालुका दापोली यांची जनरल सभा रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडली. या सभेमध्ये पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच दापोली तालुक्यासाठी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
    सभेमध्ये सर्वानुमते अतिश तुळशीराम घाडगे (भोमडी) यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच तालुका कार्यकारणीत विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड करून संघटनात्मक बळकटी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
    उपाध्यक्षपदी पवन विजय धोत्रे (वणंद), सुशील मधुकर मोरे (आसूद), प्रभाकर सुडकोजी येलवे (अगरवायंगणी), वाईद दाऊद ऐनरकर (मुरुड) आणि रुपेश गोकुळ मर्चंडे (रुखी) यांची निवड करण्यात आली.
    तालुका महासचिवपदी सुरेश धोंडू मोरे (हर्णे), तर सहसचिवपदी प्रथमेश प्रभाकर जाधव (देहेण) यांची निवड झाली. कोषाध्यक्षपदी विशाल मनोहर आयरे (दापोली) यांची नियुक्ती करण्यात आली.
    तसेच तालुका पक्ष प्रवक्ता म्हणून विजय सुदाम पवार (दापोली), तालुका संपर्क प्रमुख म्हणून सुरेश दत्ताराम चाफे (अडखळ) यांची निवड झाली.
    तालुका संघटक म्हणून विरेंद्र विलास मोरे (आसूद), निलेश विठ्ठल रूके (कर्दे), महेश मोहन मर्चंडे (सोंडेघर), अमोल गोपाळ धोत्रे (वणंद), दिलीप सजन जाधव (खेर्डी), मनोज लक्ष्मण तांबे (पंचनदी), जयप्रकाश गुप्ता (दापोली) आणि तौफीक सिद्दिकी (दापोली) यांची निवड करण्यात आली.
    याशिवाय प्रमुख सल्लागार म्हणून मधुकर तानाजी मर्चंडे (माटवण) तर सल्लागार म्हणून अशोक भार्गव येलवे (गिम्हवणे), तानाजी सुडकाजी जाधव (पाचवली), रमेश बाबू कांबळे (माटवण) आणि शांताराम रावजी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. प्रसिद्धी प्रमुखपदी मनोज गौतम तांबे (देहेण) यांची निवड करण्यात आली.
    या सभेत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

  • Related Posts

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    वाचायला विसरू नका

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम