आरोप करणे सोपे; मात्र वस्तुस्थिती जनतेसमोर येणे गरजेचे – संख्या कोळेकर

दापोलीतील वादग्रस्त प्रकरणात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी करताना सामाजिक कार्यकर्ते संख्या कोळेकर यांचे निवेदन.
दापोलीतील वादग्रस्त घटनेप्रकरणी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते संख्या कोळेकर यांनी आपली भूमिका मांडली.

दापोली (वार्ताहर): दापोली तालुक्यातील आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याच्या घटनेची चर्चा मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. मात्र या प्रकरणाबाबत आपली बाजू मांडताना सामाजिक कार्यकर्ते संख्या कोळेकर यांनी आरोप करणे सोपे असले तरी संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर येणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.

कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोग्य कर्मचारी यांची ड्युटी पिसई येथे सायंकाळी ६ वाजेपर्यंत असताना त्यांनी सुमारे ५.३० वाजताच ड्युटी सोडून सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी येऊन वैयक्तिक वाद घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी शिवीगाळ व वाद सुरू झाला. या प्रकरणात पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविण्यासाठी आम्ही निघालो असता संबंधित कर्मचाऱ्यांनी वेगाने गाडी चालवत आमच्या वाहनाला धडक दिल्याचा आरोप कोळेकर यांनी केला आहे.

या घटनेदरम्यान मारहाण झाली असून कपडे फाटले असल्याचेही त्यांनी सांगितले. ड्युटीवर असताना शासकीय गणवेशाचा धाक दाखवून खाजगी व्यवसायाच्या ठिकाणी येऊन दादागिरी करणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुळात हा वाद एका अपघाताच्या घटनेतून निर्माण झाला होता. फोनवर सामंजस्याने तो सोडवण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस ठाण्यात जाऊन कायदेशीर मार्गाने तो सोडवू, अशी आमची भूमिका होती. मात्र तरीही संबंधित कर्मचाऱ्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व धमक्या दिल्याचा आरोप कोळेकर यांनी केला आहे.

शासकीय कर्मचारी कार्यक्षेत्र सोडून खाजगी वादासाठी गणवेशाचा गैरवापर करीत असल्यास त्याचा आरोग्य विभागाच्या प्रतिमेवर परिणाम होतो. अशा काही कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत, असेही कोळेकर यांनी म्हटले आहे.

या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७४, ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३/५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे कोळेकर यांनी सांगितले. संबंधित आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Related Posts

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम