मध्य-पूर्वेतील तणावाचे पडसाद आता समुद्री मार्गांवरही उमटू लागले आहेत. Hormuz Strait येथे बुधवारी थायलंडच्या झेंड्याखाली धावणाऱ्या मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज भारतातील Kandla Port येथे येत होते. या हल्ल्यात जहाजाला आग लागली असून २३ पैकी २० खलाशांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे. मात्र तीन खलाशी अजूनही बेपत्ता असल्याची माहिती Royal Thai Navy कडून देण्यात आली.
‘मयुरी नारी’ जहाजावर हल्ला
हल्ला झालेल्या जहाजाचे नाव Mayuree Naree असून ते थायलंडच्या झेंड्याखाली धावणारे बल्क कॅरियर आहे. बँकॉकमधील शेअर बाजारात नोंदणीकृत Precious Shipping PCL या कंपनीचे हे जहाज आहे.
हे जहाज Khalifa Port येथून भारतातील कांडला बंदराच्या दिशेने रवाना झाले होते. सुमारे १७८ मीटर लांबीचे आणि सुमारे ३० हजार टन वजनाचे हे मोठे मालवाहू जहाज असल्याची माहिती समोर आली आहे.
हल्ला कसा झाला?
११ मार्च रोजी सकाळी सुमारे ११ वाजता (थायलंड वेळेनुसार) जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून जात असताना अचानक जहाजाच्या मागील भागात स्फोट झाला. दोन क्षेपणास्त्रे जहाजाच्या वॉटरलाइनच्या वर आदळल्याने इंजिन रूममध्ये भीषण आग लागली.
या हल्ल्याची जबाबदारी Islamic Revolutionary Guard Corps ने स्वीकारल्याचे इराणच्या Tasnim News Agency ने म्हटले आहे.
२० खलाशी सुरक्षित, ३ बेपत्ता
हल्ल्यानंतर जहाजाचे कॅप्टन यांनी जहाज सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खलाशांनी लाइफबोटच्या सहाय्याने समुद्रात उड्या घेतल्या.
Royal Navy of Oman ने तातडीची बचाव मोहीम राबवून २० खलाशांना सुरक्षित बाहेर काढले आणि त्यांना ओमानमधील Khasab Port येथे आणले. मात्र इंजिन रूममध्ये ड्यूटीवर असलेले तीन खलाशी अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे.
आग नियंत्रणात; पर्यावरणीय धोका नाही
या घटनेनंतर United Kingdom Maritime Trade Operations (UKMTO) ने जाहीर केले की जहाजावरील आग नियंत्रणात आणण्यात यश आले असून समुद्राला कोणताही पर्यावरणीय धोका निर्माण झालेला नाही.
एका दिवसात तीन जहाजांवर हल्ले
बुधवारी केवळ ‘मयुरी नारी’वरच नव्हे, तर ‘स्टार ग्विनेथ’ आणि एका कंटेनर जहाजावरही संशयास्पद क्षेपणास्त्र हल्ले झाल्याची माहिती UKMTO ने दिली आहे.
Iran – United States – Israel या देशांमधील वाढत्या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांची संख्या अलीकडच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात घटल्याचेही सां

गितले जात आहे.





