
दापोली : भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बौद्धजन सेवा संघ, मुंबई, तालुका दापोली-मंडणगड, तसेच जेसीआय दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
सहभागी संस्था
१) नव चिपळूण नेत्रसेवा उपक्रम
• मोफत नेत्र तपासणी• मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया मार्गदर्शन• औषधांचे मोफत वाटप श्री. संदीप नलावडे (विकास अधिकारी)
२) शितल फाउंडेशन / अभिनंदन व्हेंचर• सर्वसाधारण आरोग्य तपासणी• रुग्ण सल्ला व औषध वाटप सहभाग – श्री. सुरज जाधव (को-ऑर्डिनेटर) डॉ. फरहाना सय्यद
३) माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट
• महिलांसाठी मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन सहभाग – सुनिल देसाई सहसंस्थापक व सौ. निशा सावंत
• *बौद्धजन सेवा संघातर्फे मोफत कापडी सॅनिटरी पॅड वाटप*
४) व्यसनमुक्ती मार्गदर्शन सेवा
• समुपदेशन व औषधोपचार
सहभाग – Bk. सरिका बहनजी व Bk. विद्या बहनजी (ब्रह्माकुमारीज, दापोली सेवाकेंद्र)
*उपस्थित वैद्यकीय तज्ञ (Doctors Panel)*
• डॉ. कुणाल मेहता (MBBS, MS)
• डॉ. पवन सावंत (Ophthalmologist)
• डॉ. तुषार भागवत (MS)
• डॉ. सुयोग भागवत (MBBS, MD)
• डॉ. अनिल काकडे (Gynecologist)
• डॉ. अमित वीरकर (BDS)
• डॉ. पियुष सोनजे (MS Ortho)
• डॉ. ओंकार बागडे (MDS)
• डॉ. समर्थ पेंढर
• डॉ. स्वप्निल मोघे
• डॉ. महेंद्र पाटील
शिबिरादरम्यान सोनोग्राफीची गरज भासल्यास डॉ. समीक्षा कुणाल मेहता यांच्या निदान केंद्रात सोनोग्राफीवर २०% सवलत देण्यात येणार आहे.
*शिबिर स्थळ*
चिंतामणी कॉम्प्लेक्स टेरेस, चिपळूण नागरी पतसंस्थेजवळ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर, केळसकर नाका, दापोली.
माहितीसाठी संपर्क
आयु. शरद जाधव – ९४०५९७०७३४ / ७८९८२३५५५०
आयु. प्रीतम रूके – ७५८८९३३५५५
जेसी कुणाल मंडलिक – ९०२८६६६९०१
ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांकडून करण्यात आले आहे.





