
दापोली शहरासह परिसरातील गावांमधील हिंदू समाजाचे विशाल हिंदू संमेलन आज, रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या मराठा मंदिर क्रीडांगणावर, टेलिफोन एक्स्चेंजजवळ सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या संमेलनाच्या माध्यमातून समाजातील एकोपा वाढवणे, विविध प्रश्नांवर चर्चा करणे तसेच सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत करणे हा उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
संयोजक मिलिंद शेठ यांनी आवाहन करताना सांगितले की, “देव, देश आणि धर्मासाठी समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे. एकजूट निर्माण झाली तर समाजासमोरील विविध प्रश्नांवर प्रभावीपणे मार्ग काढता येईल.”
या संमेलनात दापोली व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






