
खेड (प्रतिनिधी):
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आपल्या लेखणीने निस्वार्थ सेवा देणारे दापोली, रत्नागिरी येथील तरुण तडफदार पत्रकार सन्माननीय संदीप सदानंद जाधव यांना यंदाचा मानाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून ‘दिशा महाराष्ट्राची’ वाहिनीच्या वतीने ५ व्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा दिमाखदार सोहळा २६ एप्रिल २०२६ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, खेड येथे पार पडला.
संदीप जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या गुणांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकता आणि तळमळ लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. ‘दिशा महाराष्ट्राची’चे संपादक तुषार नेवरेकर आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना हे सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
संदीप जाधव यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे दापोली तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल विद्या वंदा न्यूज परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा! 💐💐💐💐





