
📍 राजापूर (प्रतिनिधी):
राजापूर तालुक्यातील आडिवरे परिसरात एका शिक्षकाकडून महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित शिक्षकाविरोधात नाटे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.
🧾 सविस्तर बातमी:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनाथ नारायण वाकडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो आडिवरे परिसरातील एका नामांकित हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.
पीडित महिला २० व २१ एप्रिल रोजी परिसरातील काजूच्या बागेत कुंपणासाठी खड्डे खोदण्याचे काम करत होती. या दरम्यान आरोपीने महिलेला एकटी गाठून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे.
या घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ नाटे सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तातडीने तपास सुरू केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रीच शोधमोहीम राबवून आरोपीला अटक केली.
🚨 पोलिसांची कारवाई:
नाटे पोलिसांनी जलद गतीने कारवाई करत आरोपी शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.





