रिक्षा चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला फरार चालक २ तासांत जेरबंद

“संगमेश्वर येथे रिक्षाला भरधाव वाहनाची धडक बसून रिक्षाचालकाचा मृत्यू; अपघातानंतर फरार झालेला स्कॉर्पिओ चालक देवरूख आणि साखरपा पोलिसांनी अवघ्या २ तासांत आंबा घाट परिसरातून अटक केल्याची बातमी.”
संगमेश्वर येथे रिक्षा अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू; फरार स्कॉर्पिओ चालक अवघ्या २ तासांत पोलिसांच्या जाळ्यात.

संगमेश्वर :- रत्नागिरी–नागपूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील देवळे फाटा येथे उभ्या रिक्षाला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या वाहनचालकाला देवरूख आणि साखरपा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली.

मृत रिक्षाचालक विजय पांडुरंग कांबळे (वय ६२, रा. चाफवली) हे देवळे फाट्यावर प्रवाशांची वाट पाहत रिक्षा उभे होते. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव स्कॉर्पिओ वाहनाने (एमएच ०९ जीए ६८८६) त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा सुमारे दहा फूट दूर फेकली गेली आणि विजय कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला होता.

घटनेची माहिती मिळताच देवरूख आणि साखरपा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित वाहनाची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आंबा घाट परिसरात शोधमोहीम राबवत अवघ्या काही तासांतच आरोपी चालकाला ताब्यात घेतले.

ही कारवाई देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहा. पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, हे. कॉ. गणेश सुतार, चालक कांबळे, पो.हे.कॉ. सचिन कामेरकर, पो.हे.कॉ. सचिन पवार यांच्या पथकाने केली. या कारवाईसाठी पोलीस मित्र सुभाष सुर्वे यांनीही सहकार्य केले.

पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

  • Related Posts

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    वाचायला विसरू नका

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम