
मुंबई, प्रतिनिधी : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने २० अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे मुंबई–कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगांव रेल्वे स्थानक – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडीच्या एकूण ४ सेवा चालविण्यात येणार आहेत.
साप्ताहिक विशेष गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
गाडी क्रमांक ०१००३ (लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगांव)
दिनांक ०२ मार्च व ०९ मार्च २०२६ रोजी दर सोमवारी सकाळी ०८.२० वा. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल व त्याच दिवशी रात्री २२.४० वा. मडगांव येथे पोहोचेल. (२ सेवा)
गाडी क्रमांक ०१००४ (मडगांव – लोकमान्य टिळक टर्मिनस)
दिनांक ०१ मार्च व ०८ मार्च २०२६ रोजी दर रविवारी सायं. १६.३० वा. मडगांव येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ०५.५० वा. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (२ सेवा)
या गाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम व करमाळी हे महत्त्वाचे थांबे देण्यात आले आहेत.
आरक्षणाची सुविधा :
गाडी क्रमांक ०१००३ साठी आरक्षण २८ फेब्रुवारी २०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व IRCTC च्या www.irctc.co.in� संकेतस्थळावर सुरू करण्यात येणार आहे.
दिवा – चिपळूण – दिवा अनारक्षित विशेष गाडी (१६ सेवा)
होळीच्या कालावधीत दिवा ते चिपळूण दरम्यान अनारक्षित विशेष गाडीच्या १६ अतिरिक्त सेवा चालविण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक ०११५९ (दिवा – चिपळूण)
दिनांक ०१ मार्च ते ०८ मार्च २०२६ दरम्यान दररोज रात्री २३.२५ वा. दिवा येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.३० वा. चिपळूण येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११६० (चिपळूण – दिवा)
दिनांक ०१ मार्च ते ०८ मार्च २०२६ दरम्यान दररोज दुपारी १५.३० वा. चिपळूण येथून सुटेल व रात्री २३.१० वा. दिवा येथे पोहोचेल.
या गाड्यांना निळजे, तळोजा पांचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, आपटा, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, माणगांव, वीर, करंजाडी, खेड, अंजणी आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
या सर्व गाड्या अनारक्षित स्वरूपात चालविण्यात येणार असून सामान्य सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस प्रमाणेच भाडे आकारले जाणार आहे.
प्रवाशांनी विशेष गाड्यांच्या वेळापत्रक व थांब्यांची सविस्तर माहिती www.enquiry.indianrail.gov.in� संकेतस्थळावर किंवा NTES ॲपवर पाहावी, तसेच होळी सणाच्या काळात या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





