मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी सुरक्षा सूचना; दूतावासांकडून हेल्पलाइन जारी

मुंबई : मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या सूचनेमध्ये पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी विशेष दक्षता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून वेळोवेळी आवश्यक सूचना जारी केल्या जात आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या वतीनेही परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासन सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

📞 आपत्कालीन संपर्क तपशील

रामल्ला (पॅलेस्टाईन)

फोन : +970592916418

ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in

दोहा (कतार)

फोन : 00974-55647502

ईमेल : cons.doha@mea.gov.in

रियाध (सौदी अरेबिया)

फोन : 00-966-11-4884697

WhatsApp : 00-966-542126748

टोल फ्री : 800 247 1234

ईमेल : cw.riyadh@mea.gov.in

तेल अवीव (इस्रायल)

फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378

ईमेल : cons1.telaviv@mea.gov.in

तेहरान (इराण)

फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)

टोल फ्री : 800-46342

WhatsApp : +971543090571

ईमेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in

कुवैत

फोन : +96565501946

ईमेल : community.kuwait@mea.gov.in

बाहरीन

फोन : 00973-39418071

मस्कत (ओमान)

टोल फ्री : 80071234

WhatsApp : +96898282270

ईमेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in

जॉर्डन

फोन : 00962-770 422 276

बगदाद (इराक)

फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899

वेबसाइट : eoibaghdad.gov.in

ईमेल : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in

(विद्या वंदा न्यूज साप्ताहिक)

Related Posts

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम