जानवळे मोहल्ला येथे इफ्तार पार्टी उत्साहात साजरी

जानवळे मोहल्ला येथे आयोजित इफ्तार पार्टीमध्ये प्रमुख पाहुणे प्रमोदजी गांधी, मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित असल्याचे दृश्य.

जानवळे मोहल्ला येथे रमजान निमित्त आयोजित इफ्तार पार्टीमध्ये प्रमुख पाहुणे प्रमोदजी गांधी व मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित.

जानवळे मोहल्ला, गुहागर येथे आयोजित इफ्तार पार्टी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रमोद गांधी, विनोद जानवळकर, वैभवी जानवळकर व ग्रामस्थ उपस्थित
जानवळे मोहल्ला, गुहागर येथे आयोजित इफ्तार पार्टी प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रमोद गांधी, विनोद जानवळकर, वैभवी जानवळकर व इतर मान्यवरांसह उपस्थित ग्रामस्थ.

गुहागर (प्रतिनिधी – मंगेश जाधव):
गुहागर तालुक्यातील जानवळे मोहल्ला येथे पवित्र रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नूतन जिल्हा परिषद सदस्य तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष श्री. प्रमोदजी गांधी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हाध्यक्ष श्री. विनोद जानवळकर आणि जानवळे गावच्या उपसरपंच सौ. वैभवी जानवळकर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. प्रमोदजी गांधी यांनी सांगितले की, समाजात सर्वधर्मीय एकोप्याचे वातावरण निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. इफ्तार पार्टीसारख्या सामाजिक कार्यक्रमांमुळे समाजात ऐक्य, बंधुभाव आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक दृढ होते. अशा उपक्रमांमुळे विविध समाजघटक एकत्र येऊन सामाजिक सलोखा वाढविण्यास मदत होते. त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, सरपंच सौ. जान्हवी विखारे, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले असून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

  • Related Posts

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    वाचायला विसरू नका

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम