दापोलीत गांजाचे सेवन करताना इसम रंगेहात पकडला; पोलिसांची धडक कारवाई

“दापोलीतील पांगारवाडी येथे गांजाचे सेवन करताना पोलिसांनी एका व्यक्तीला रंगेहात पकडत केलेली कारवाई.”
दापोली पोलिसांनी पांगारवाडी येथे छापा टाकून गांजाचे सेवन करताना एका व्यक्तीला रंगेहात पकडले.

दापोली (वार्ताहर) : अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत दापोली पोलिसांनी जालगाव पांगारवाडी येथे कारवाई करत गांजाचे सेवन करणाऱ्या एका ५१ वर्षीय व्यक्तीला रंगेहात पकडले आहे. राजेंद्र अनंत घाग (रा. पांगारवाडी, जालगाव, ता. दापोली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्याविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल बळीराम बालाजी चोंडे व त्यांच्या पथकाला पांगारवाडी परिसरात एक व्यक्ती अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पांगारवाडी येथील घर क्रमांक ४५३ येथे छापा टाकला.

या छाप्यात आरोपी राजेंद्र घाग हा गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करत असताना पोलिसांना रंगेहात आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गांजाचे सेवन केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ (NDPS Act) अंतर्गत कलम ८(अ) व २७ अन्वये रजिस्टर क्रमांक ३१/२०२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास पूर्ण करण्यात आली.

दरम्यान, दापोली परिसरात अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस पथकाकडून करण्यात येत आहे.

  • Related Posts

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    वाचायला विसरू नका

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम