मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

“पेण तालुक्यातील बुर्डी गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव ब्रेझा कारच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झालेल्या भीषण अपघाताचे दृश्य.”
पेण तालुक्यातील बुर्डी गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू.

पेण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील बुर्डी गावाजवळ गुरुवारी (दि. ६ मार्च) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ७.३५ वाजण्याच्या सुमारास बुर्डी बसस्टॉपसमोर हा अपघात घडला. लाल रंगाची ब्रेझा कार (क्र. MH 06 BU 4664) चालकाने आपली कार अतिवेगाने व बेदरकारपणे चालवत गोवा दिशेकडील लेनवरून जात असताना एल अँड टी कॉलनी, सालींदे येथून बुर्डी गावाकडे रस्ता ओलांडत असलेल्या दोघांना जोरदार धडक दिली.

या अपघातात प्रदीप कुमार साहब सिंग (वय ३३) व अजय कुमार रामप्रकाश (वय ३१) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही सध्या एल अँड टी कॉलनी, सालींदे (ता. पेण) येथे राहत होते असून मूळचे उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच हातपायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी तक्रारदार सुनील शंकर पाटील (पोलीस पाटील, सालींदे) यांच्या फिर्यादीवरून वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून महामार्गावरील वेगवान वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

  • Related Posts

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    वाचायला विसरू नका

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम