विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी दापोली कृषी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकाची पदानवती; वेंगुर्ला येथे बदली

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी सहयोगी प्राध्यापकाची पदानवती करून वेंगुर्ला येथे बदली करण्यात आली.
दापोली कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी सहयोगी प्राध्यापकावर कारवाई; पदानवती करून वेंगुर्ला येथे बदली.

दापोली, ता. १२ (वार्ताहर) : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका सहयोगी प्राध्यापकाविरुद्ध विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी गंभीर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्राध्यापकाची सहयोगी प्राध्यापक पदावरून सहाय्यक प्राध्यापक पदावर पदानवती करण्यात आली असून त्यांची प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे बदली करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृषी महाविद्यालय दापोली येथे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने १८ जुलै २०२५ रोजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना लेखी तक्रार देत संबंधित सहयोगी प्राध्यापकाने आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने संबंधित प्राध्यापकाला सेवेतून निलंबित केले.

त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ६ ऑगस्ट २०२५ रोजी त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने केलेल्या चौकशीअंती नुकताच आपला अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडे सादर केला आहे.

चौकशी अहवालात संबंधित प्राध्यापकाने आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर केला असून शिक्षक-विद्यार्थी या पवित्र नात्याला तडा देणारे कृत्य केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच हे कृत्य नैतिक अध:पतन दर्शविणारे, कायदा व सेवा नियमांचे उल्लंघन करणारे आणि शासकीय सेवेस अशोभनीय असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

या अहवालाच्या आधारे विद्यापीठ प्रशासनाने कठोर कारवाई करत संबंधित प्राध्यापकाची पदानवती करून त्यांची प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे बदली केली आहे.

दरम्यान, संबंधित प्राध्यापकांची सेवा आणखी दोन वर्षे शिल्लक असून या शिक्षेमुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Posts

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम