गाव विकास समिती संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर सुरेंद्र काबदुले उपाध्यक्ष तर मुझम्मील काझी सरचिटणीस

    गाव विकास समिती संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; सुरेंद्र काबदुले उपाध्यक्ष तर मुझम्मील काझी सरचिटणीसदेवरुख येथे झालेल्या बैठकीत गाव विकास समिती संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर

संगलट (खेड) : इक्बाल जमादार

गाव विकास समिती संघटनेच्या कोअर कमिटीने शिफारस केलेल्या नावांवर शिक्कामोर्तब करत देवरुख येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष उदय गोताड आणि संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्यात झालेल्या सविस्तर चर्चेनंतर ही कार्यकारिणी अंतिम करण्यात आली असून, अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांना या कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.

नव्या कार्यकारिणीनुसार उदय गोताड हे अध्यक्षपदी तर सुहास खंडागळे हे संघटन प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. उपाध्यक्षपदी सुरेंद्र काबदुले, मंगेश धावडे आणि राहुल यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या महत्त्वाच्या सरचिटणीस पदावर मंगेश कांगणे आणि मुझम्मील काझी यांची निवड झाली असून, मुझम्मील काझी यांच्याकडे मुख्य प्रवक्त्याची अतिरिक्त जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.

संघटनेच्या जिल्हा पातळीवरील बांधणीसाठी श्यामकर्ण भोपळकर यांना रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी कायम ठेवण्यात आले आहे. तसेच सुकांत पाडळकर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सतेश जाधव यांच्याकडे जिल्हा सरचिटणीस व मुख्य प्रचारक पदाची जबाबदारी देण्यात आली असून विशाल धुमक यांची जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली आहे.

तालुका पातळीवर अमित गमरे यांना संगमेश्वर तालुका अध्यक्ष म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. त्यांच्या सोबत वैभव जुवळे (कार्याध्यक्ष), नितीन गोताड (उपाध्यक्ष), दैवत पवार (सरचिटणीस), महेंद्र घुग (संघटक) आणि प्रकाश खंडागळे (सचिव) अशी टीम नियुक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सुकांत पाडळकर यांच्याकडे रत्नागिरी तालुका अध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

महिला आघाडीच्या सक्षमीकरणासाठी सौ. दीक्षा खंडागळे यांची अध्यक्षा, सौ. ईश्वरी यादव यांची उपाध्यक्षा आणि सौ. उजमा मापारी-खान यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. तसेच सौ. अनवी घुग आणि सौ. नियती गोताड यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

नव्या दमाच्या या कार्यकारिणीमुळे गाव विकास समिती संघटनेच्या कामाला अधिक गती मिळेल आणि ग्रामीण भागातील विकासाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

  • Related Posts

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    वाचायला विसरू नका

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम