राजापूर : अनधिकृत मासेविक्री प्रकरणी १३ महिलांवर गुन्हा
राजापूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पथ ते बाजारपेठ भागात सुरू असलेल्या अनधिकृत मासेविक्रीवर कारवाई केली. या दरम्यान, नगर परिषद कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी १३ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर परिषदेचे स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव (५५) यांनी हा फिर्याद राजापूर पोलिसांत दाखल केला आहे. शुक्रवार, १३ मार्च रोजी नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अमित पोवार आणि इतर सफाई कर्मचाऱ्यांसह वरिष्ठांच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज पथ परिसरात कारवाईसाठी गेले होते.
या ठिकाणी अनेक महिला अनधिकृतपणे रस्त्यावर मासे विक्री करत होत्या. नगर परिषदेच्या पथकाने त्यांना मच्छी मार्केटमध्ये बसण्याबाबत वारंवार सूचना दिल्या, मात्र महिलांनी हलण्यास नकार दिला व रस्त्यावरच मासे विक्री सुरू ठेवली. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आणि नागरिकांना व पादचारी व स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागला.
तसेच काही महिलांनी रस्त्यावरच मासे साफ करत असल्याने खवले आणि सांडपाणी परिसरात पसरले, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. पालिकेकडे या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
या प्रकरणी खालील १३ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
सुमैया बोरकर, नाजिया वाडकर, निलोफर होडेकर, अक्सा सोलकर, मिनाज भाटकर, रुक्साना बोरकर, अनिसा सोलकर, अक्सा पावसकर, नाजिया मंचेकर, मुमताज पिरकर, शबाना काझी, मुमताज फडणीस आणि नसरीन सोलकर (सर्व रा. नाटे, कातळी, कोंढे इ.).
गुन्हा दाखल करण्यात आलेले कलमे:
महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ : कलम २६७ व २६९
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ : कलम ११५
नगर परिषदेच्या अधिकार्यांनी नागरिकांचे आरोग्य आणि परिसरातील स्वच्छतेसाठी ही कारवाई महत्त्वाची असल्याचे सां

गितले आहे.





