राज्यावर अवकाळीचे संकट; पुढील आठवडाभर वादळी पावसाची शक्यता

"राज्यातील काही भागात वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठेवावी"
“राज्यात पुढील आठवडाभर वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठेवावीत”

मुंबई / राज्यभर: राज्याच्या अनेक भागात हवामानात बदल जाणवत असून, पुढील आठवडाभर अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्याच्या दक्षिण भागात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. या बदलाचा सर्वाधिक फटका ३० आणि ३१ मार्च दरम्यान दिसण्याची शक्यता आहे. या कालावधीत खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मध्ये मेघगर्जना, वेगवान वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

राज्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असताना निसर्गाचा हा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे:

“शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवावे, काढणी केलेली रब्बी पिके सुरक्षित ठिकाणी हलवावीत आणि कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक खबरदारी घ्यावी.”

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना:

कापणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी साठवावे किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावे.

बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला माल भिजणार नाही, याची दक्षता घ्यावी.

Related Posts

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम