
मुंबई / दादर: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे की, येत्या १५-२० दिवसांत मागणी मान्य न झाल्यास उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या देखील जाऊ देणार नाहीत.
पूर्वी दादर ते रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकामधून धावली जात असल्याने मुंबईकर आणि कोकणवासीयांना गैरसोय झाली होती. रेल्वे प्रशासनाने याबाबत ठोस कारण न देता हा निर्णय घेतल्याचा मनसेने आरोप केला आहे.
मध्य रेल्वेने यावर स्पष्टीकरण दिले आहे की, २०२१ मध्ये कोरोनानंतर दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकामधून धावण्यास सुरुवात झाली. यावेळी क्रॉसिंगसाठी इतर लोकल गाड्यांना थांबावे लागत असल्यामुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत होता. त्यामुळे ट्रेन दिवा स्थानकामधून धावली जात होती आणि आता वेळापत्रक सुधारले आहे.
गोरखपूरकडे जाणारी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून धावणारी गाडीही दादर स्थानकावरून नियमित चालू आहे. आतापर्यंत १७ मार्चपर्यंत १४ गाड्यांना रेगुलर टेनचा दर्जा मिळाला असून, त्यापैकी ७ गाड्या महाराष्ट्रातून महाराष्ट्रात चालतात.
सध्या कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेत एकूण २१ दररोज गाड्या चालवल्या जातात. याशिवाय वसई रोड वरून पनवेल मार्गे २५ गाड्या, तसेच गणेशोत्सव, होळी आणि उन्हाळ्यासाठी विशेष गाड्या देखील चालवल्या जातात.
जुलै २०२३ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, सप्टेंबर २०२४ पासून बांद्रा टर्मिनस ते मडगाव आठवड्यातून दोनदा, आणि नोव्हेंबर २०२२ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.





