
नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी खासगी तेल आणि वायू उत्पादक कंपनी केर्न ऑईल अँड गॅस (Cairn Oil & Gas) पुढील दशकात कच्च्या तेलाचं उत्पादन चार पटीनं वाढवून दररोज १० लाख बॅरलपर्यंत नेण्याचा महत्त्वाकांक्षी प्लॅन आखत आहे. ही माहिती कंपनीचे प्रमुख आणि उद्योजक अनिल अग्रवाल यांनी दिली.
वेदांता लिमिटेडच्या उपकंपनी असलेल्या केर्नने अमेरिकेतील ह्युस्टन येथे ऑईलफील्ड कंत्राटदारांवर सुमारे ५ अब्ज डॉलर (सुमारे ४७ हजार कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. या माध्यमातून देशांतर्गत ऑईल फील्ड विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
‘यूएस शेल प्लेबुक’चा वापर
कंपनी भारतात ‘यूएस शेल प्लेबुक’ लागू करण्याच्या तयारीत असून यासाठी १० अमेरिकन तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे ड्रिलिंग आणि उत्पादन प्रक्रियेतील वेळ एक तृतीयांशाने कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उत्पादनाचा वेग वाढेल.
शेल विहिरींचं ड्रिलिंग पूर्ण
केर्नने आतापर्यंत चार शेल विहिरींचं ड्रिलिंग पूर्ण केलं असून त्यांचं उत्पादन सुरू होण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उत्पादनात तात्पुरती घट
दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्षामुळे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ मार्गावर परिणाम झाल्याने शिपिंग आणि लॉजिस्टिक्समध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे कंपनीने उत्पादनात सुमारे १०% कपात केली असून सध्या उत्पादन १.१० लाख बॅरल प्रतिदिन इतकं आहे.
पुढील ५ वर्षांत मोठी झेप
कंपनीचं उद्दिष्ट पुढील पाच वर्षांत उत्पादन ५ लाख बॅरल प्रतिदिन इतकं वाढवण्याचं आहे. भारताची आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.





