घरात झोपलेल्या वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू; पोलिस तपास सुरू

दापोली (प्रतिनिधी) : तालुक्यातील करंजणी येथील दर्भाचीवाडीमध्ये एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुलोचना श्रीपत सावंत (वय ८१, रा. करंजणी-दर्भाचीवाडी, ता. दापोली) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संबंधित महिला आपल्या घरात झोपलेल्या अवस्थेत आढळून आली. मात्र, बराच वेळ कोणतीही हालचाल दिसून न आल्याने शेजाऱ्यांनी पाहणी केली असता त्या बेशुद्ध अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ दापोली पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेहाचा पोस्टमार्टेम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

करंजणी-दर्भाचीवाडी येथे ८१ वर्षीय वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू; दापोली पोलिस तपास सुरू
८१ वर्षीय वृद्ध महिलेचा घरात झोपेत असताना संशयास्पद मृत्यू; पोलिस तपास सुरू आहे.

 

Related Posts

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम