आकाशातून कोसळला ५ किलोचा ‘बर्फाचा गोळा’; मालवणात अजब घटना

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात एक अजब आणि आश्चर्यकारक घटना घडली असून आकाशातून सुमारे पाच किलो वजनाचा बर्फाचा मोठा तुकडा घरावर कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवली (ता. मालवण) येथील खालची परबवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अर्चना देऊलकर या आपल्या घरात स्वयंपाक करत असताना अचानक मोठा आवाज झाला.

आवाजाचा स्रोत शोधण्यासाठी बाहेर पडल्यावर छतावरील कौले व लाकडी भाग तुटलेले दिसले. तपास केला असता सुमारे पाच किलो वजनाचा बर्फाचा गोळा थेट स्वयंपाकघरात पडल्याचे आढळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विशेष म्हणजे घटना घडली त्या वेळी आकाश पूर्णपणे निरभ्र होते. भर उन्हाळ्यात अचानक बर्फाचा तुकडा कोसळल्याने ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले असून परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

तज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या घटना कधीकधी विमानातून गळणाऱ्या बर्फामुळे (ब्ल्यू आईस) घडू शकतात. मात्र या घटनेबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नसून तपासाची गरज व्यक्त केली जात आहे.

मालवणात आकाशातून पडलेला बर्फाचा गोळा
देवली येथे घरावर कोसळलेला बर्फाचा तुकडा; ग्रामस्थांमध्ये आश्चर्य

 

Related Posts

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम