जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीने नगरपंचायत क्षेत्रात अतिदक्षता विभागासह दवाखाना उभारण्याची मागणी

प्रतिनिधी – गुहागर

. निलेश सांबरे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गुहागर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करताना मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित.
Fruit distribution to patients at Guhagar Rural Hospital by Jijau Social Organization on the occasion of Dr. Nilesh Sambare’s 50th birthday, in the presence of dignitaries

गुहागर नगरपंचायत क्षेत्रात स्वतंत्र दवाखाना तसेच अतिदक्षता विभाग (ICU) सुरू करण्यात यावा, अशी मागणी जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली. ही मागणी पत्रकार व बळीराजा सेनेचे जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे केली.

डॉ. निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप कार्यक्रम उत्साहात

जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. निलेश सांबरे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गुहागर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळवंत, डॉ. चंदनशिवे, अॅड. प्रसाद जांगळी, तेज सोशल फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष अभय हळये, शिवसेना तालुका प्रवक्ते संतोष आग्रे, सामाजिक कार्यकर्ते किशोर भागडे, अनिल घुमे, बालुकाका बेंडल तसेच पोलीस भरती अकॅडमीचे विद्यार्थी आणि संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांचे मार्गदर्शन व संस्थेच्या कार्याचे कौतुक

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अॅड. प्रसाद जांगळी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. जिजाऊ संस्थेच्या वतीने सर्वांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी आपल्या भाषणात जिजाऊ सामाजिक संस्थेच्या कार्याचे कौतुक करत, नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

स्वतंत्र दवाखाना व ICU सुरू करण्याची मागणी

पराग कांबळे यांनी आपल्या भाषणात गुहागर नगरपंचायत क्षेत्रात जिजाऊ सामाजिक संस्थेच्या सहकार्याने स्वतंत्र दवाखाना सुरू करण्याची गरज व्यक्त केली. तसेच अतिदक्षता विभाग (ICU) सुरू करून तालुक्यातील रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. या दवाखान्यासाठी नगरपंचायतीकडून गावठाण जागा उपलब्ध करून देण्याची विनंतीही त्यांनी केली.

फळवाटपाने कार्यक्रमाची सांगता

डॉ. निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप करण्यात आले. कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

  • Related Posts

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    वाचायला विसरू नका

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम