खून प्रकरणातील तीनही आरोपींना अटक

खून प्रकरणातील तीनही आरोपींना अटक

खेड :- तालुक्यातील मेटे मोहल्ला येथील शफी अब्दुल्ला वरवटकर (वय ५५) यांच्या खूनप्रकरणी पोलिसांना अनेक दिवस गुंगारा देणाऱ्या तीन आरोपींना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. कादिर शमशुद्दीन घारे, गणी इस्माईल बोट आणि अशरफ महामूद बोट (तिघेही रा. मेटे-मोहल्ला, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ही कारवाई गुरुवारी, २३ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास खेड एसटी बसस्थानक परिसरात करण्यात आली. तब्बल १७ दिवस पोलिसांना चकवा देत हे तिघेही पसार होते.

प्राप्त माहितीनुसार, शफी वरवटकर यांची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. ही माहिती असूनही ६ एप्रिल रोजी सायंकाळी कादिर घारे, गणी बोट आणि अशरफ बोट यांनी शफी वरवटकर यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत शफी वरवटकर यांचा मृत्यू झाला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शेख अली हसन वरवटकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार होते.

पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके त्यांचा शोध घेत होती. अखेर आरोपी खेड परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी तिन्ही फरार आरोपींना अटक केली.

पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

खून प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची बातमी दर्शवणारा न्यूज पोस्टर. यात तीन आरोपींना पोलिसांच्या ताब्यात उभे दाखवले असून त्यांच्या शेजारी पोलीस कर्मचारी आहेत. पार्श्वभूमीत खेड पोलीस ठाण्याचे दृश्य दिसते. उजव्या बाजूला प्रकरणाची माहिती मराठीत मुद्देसूद स्वरूपात दिली असून वर ठळक हेडलाईनमध्ये “खून प्रकरणातील तीनही आरोपींना अटक” असे लिहिले आहे.
खेड तालुक्यातील मेटे मोहल्ला खूनप्रकरणातील तीनही फरार आरोपींना १७ दिवसांनंतर पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून, एसटी बसस्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली.
  • Related Posts

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    वाचायला विसरू नका

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम