
दापोली (प्रतिनिधी) – ‘दिशा महाराष्ट्राची’ या संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय चौथे कवी संमेलन ‘कलाविष्कार’ व पाचव्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात दापोली (जि. रत्नागिरी) येथील सुधीर महादेव कालेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्कार २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले.
समाजकारण, राजकारण, शिक्षण तसेच सहकार क्षेत्रात सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कालेकर यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राज्यभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलन **‘कलाविष्कार’**ला विशेष प्रतिसाद लाभला. राज्यातील विविध भागांतील कवी व साहित्यिकांनी सहभाग घेत आपल्या काव्यरचना सादर केल्या. उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात कवींना उत्स्फूर्त दाद दिली.
पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सुधीर कालेकर यांचे दापोली तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या या यशामुळे तालुक्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी कालेकर यांनी भविष्यातही समाजहितासाठी कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
✍️ संपादक – सुदेश सुरेश तांबे
📞 संपर्क – 8080559237
📰 विद्या वंदा न्यूज
“तुमची बातमी, तुमचा हक्क!”





