🏛️ भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवारांची घोषणा; प्रमोद जठार यांना दशकानंतर मोठी संधी
भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून प्रमोद जठार यांना दशकानंतर मोठी संधी देण्यात आली आहे.
🚨 आसूदमध्ये भीषण अपघात; कार ५० फूट दरीत कोसळून तिघे गंभीर जखमी 🚨
आसूद येथे हर्णे–दापोली मार्गावर कार ५० फूट दरीत कोसळून तिघे गंभीर जखमी झाले असून ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने बचावकार्य करण्यात आले.
🚗 देवरुख येथून चोरीला गेलेली कार काही तासांतच संगमेश्वरमध्ये सापडली
देवरुख येथून चोरीला गेलेली कार पोलिसांनी काही तासांतच शोधून संगमेश्वरमधील लोवले परिसरात बेवारस अवस्थेत जप्त केली. पुढील तपास सुरू आहे.
🏛️ महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय जाहीर; AI धोरण, हरित आयोग आणि लंडनमध्ये अध्यासन केंद्र 🚀
महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत AI धोरण २०२६, हरित महाराष्ट्र आयोग, लंडन अध्यासन केंद्र आणि रत्नागिरीत केंद्रीय विद्यालयासाठी जमीन यांसह ७ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
🚨 आयशर ट्रकची महावितरणच्या खांबांना जोरदार धडक; ४० हजारांचे नुकसान 🚨
चिपळूणमध्ये आयशर ट्रकने महावितरणच्या दोन वीज खांबांना धडक दिल्याने सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिस तपास सुरू आहे.
🔥 LPG संकट आणखी गंभीर होणार? भारतासह जगाची चिंता वाढली; गॅस जपून वापरण्याचे आवाहन 🔥
सौदी अरामकोने LPG शिपमेंट्स थांबवल्याने जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून भारतासह अनेक देशांमध्ये गॅस पुरवठा आणि दरांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
🌡️ सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; १ मे रोजी पावसाचा दिलासा 🌧️
महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. मात्र १ मे रोजी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कंपनीतून २.५४ लाखांच्या वजन मापांची चोरी; ट्रक चालकावर संशय
लोटे औद्योगिक परिसरातील एका कंपनीतून सुमारे २.५४ लाख रुपयांच्या लोखंडी वजन मापांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रक चालकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. खेड पोलिस अधिक तपास करत आहेत.
महामार्गावर दुचाकीचा अपघात; चार जण जखमी
खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे फागेवाडी स्टॉपजवळ दुचाकी अपघात होऊन चार जण जखमी झाले असून जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पनवेलच्या आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे ‘बोगस इंजेक्शन रॅकेट’चा मास्टरमाइंड; राज्यभर कोट्यवधींचा घोटाळा उघड
महाराष्ट्रात बनावट इंजेक्शन विक्री रॅकेट उघडकीस आले असून पनवेल–कामोठे येथील आरआरटी फार्माचा मालक रितेश ठोंबरे याच्यावर या प्रकरणातील मुख्य भूमिका असल्याचा आरोप करण्यात आला आहे.















