दापोलीत चिरेखाणीवरील ६० हजारांची कॉपर वायर लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली तालुक्यातील साकुर्डे बौद्धवाडी येथील चिरेखाणीवर अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपये किमतीची थ्रीफेज कॉपर वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






