🚨 आयशर ट्रकची महावितरणच्या खांबांना जोरदार धडक; ४० हजारांचे नुकसान 🚨
चिपळूणमध्ये आयशर ट्रकने महावितरणच्या दोन वीज खांबांना धडक दिल्याने सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिस तपास सुरू आहे.
कंपनीतून २.५४ लाखांच्या वजन मापांची चोरी; ट्रक चालकावर संशय
लोटे औद्योगिक परिसरातील एका कंपनीतून सुमारे २.५४ लाख रुपयांच्या लोखंडी वजन मापांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रक चालकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. खेड पोलिस अधिक तपास करत आहेत.
महामार्गावर दुचाकीचा अपघात; चार जण जखमी
खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे फागेवाडी स्टॉपजवळ दुचाकी अपघात होऊन चार जण जखमी झाले असून जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.








