💥 घरावरून हकालपट्टीचा धोका टळणार..! 👉 “अतिक्रमण नियमितीकरणासाठी दापोलीत अर्ज प्रक्रिया सुरू” – तहसीलदार अर्चना बोंबे
दापोली तालुक्यात शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र नागरिकांना घरावरून हकालपट्टीचा धोका टळणार आहे. तहसीलदार अर्चना बोंबे यांनी नागरिकांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.






