कंपनीतून २.५४ लाखांच्या वजन मापांची चोरी; ट्रक चालकावर संशय
लोटे औद्योगिक परिसरातील एका कंपनीतून सुमारे २.५४ लाख रुपयांच्या लोखंडी वजन मापांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रक चालकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. खेड पोलिस अधिक तपास करत आहेत.






