🚨 मुंबई–गोवा महामार्गावर महाकोंडी; कोकणात जाणाऱ्यांची मोठी गैरसोय
मुंबई–गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून रत्नागिरी व संगमेश्वर परिसरात वाहतूक ठप्प झाली आहे. सलग सुट्ट्या, पर्यटनाचा वाढलेला ओघ आणि अपूर्ण रस्ते कामांमुळे प्रवाशांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे.






