कंपनीतून २.५४ लाखांच्या वजन मापांची चोरी; ट्रक चालकावर संशय
लोटे औद्योगिक परिसरातील एका कंपनीतून सुमारे २.५४ लाख रुपयांच्या लोखंडी वजन मापांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रक चालकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. खेड पोलिस अधिक तपास करत आहेत.
महामार्गावर दुचाकीचा अपघात; चार जण जखमी
खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे फागेवाडी स्टॉपजवळ दुचाकी अपघात होऊन चार जण जखमी झाले असून जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पनवेलच्या आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे ‘बोगस इंजेक्शन रॅकेट’चा मास्टरमाइंड; राज्यभर कोट्यवधींचा घोटाळा उघड
महाराष्ट्रात बनावट इंजेक्शन विक्री रॅकेट उघडकीस आले असून पनवेल–कामोठे येथील आरआरटी फार्माचा मालक रितेश ठोंबरे याच्यावर या प्रकरणातील मुख्य भूमिका असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लाडक्या बहिणींना मोठा दणका; अपात्र लाभार्थ्यांकडून ११ कोटी रुपयांची वसुली सुरू
‘लाडकी बहीण’ योजनेत अपात्र लाभार्थ्यांकडून सरकारकडून वसुली सुरू असून आतापर्यंत सुमारे ११ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
खेडमध्ये उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह तीन तास अंधारात; जनरेटर बंद, डिझेलअभावी सेवा ठप्प
खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने जनरेटर न सुरू झाल्यामुळे पोस्टमार्टमसाठी आणलेला मृतदेह तीन तास अंधारात पडून राहिल्याची धक्कादायक घटना घडली.
यंदा मान्सून लवकर येणार; १८ ते २५ मे दरम्यान पावसाचे आगमन होण्याचा अंदाज
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदा मान्सून १८ ते २५ मे दरम्यान अंदमान-निकोबारमध्ये लवकर दाखल होण्याची शक्यता असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो.
रत्नागिरीत गांजासह तरुण जेरबंद; १३६ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त
रत्नागिरी शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३६ ग्रॅम गांजासह एका तरुणाला अटक करण्यात आली असून एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरीत पाईपलाईन फुटून सांडपाणी रस्त्यावर; ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप
रत्नागिरीतील झाडगाव परिसरात महामार्ग कामादरम्यान पाईपलाईन फुटून सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून नागरिकांनी निष्काळजीपणावर कारवाईची मागणी केली आहे.
संगमेश्वरमध्ये ट्रक डोंगराला धडकून अपघात; चालक जखमी, ग्रामस्थांच्या मदतीने बचाव
संगमेश्वरमध्ये साखरपा–देवरुख मार्गावर ट्रक डोंगराला धडकल्याने झालेल्या अपघातात चालक जखमी झाला असून ग्रामस्थ व पोलिसांनी त्याला बाहेर काढले.
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर “Coming Soon” संकेत; १४ लाख विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे
महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल लवकरच जाहीर होण्याचे संकेत मिळाले असून डिजीलॉकरवर “Coming Soon” संदेश दिसल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.


गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के
🟥 नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरण: आरोपीला फाशीची मागणी; दापोलीत तीव्र संताप
⚠️ ओळखीच्याच तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत
🏆 २ लाख १८ हजार ९३० मतांच्या विक्रमी फरकाने सुनेत्रा पवारांचा विजय
🚌 एसटी कर्मचाऱ्यांचा तयार गणवेशाला विरोध; शिलाई भत्त्यासाठी आंदोलनाचा इशारा




















































































