🚨 मुंबई–गोवा महामार्गावर महाकोंडी; कोकणात जाणाऱ्यांची मोठी गैरसोय
मुंबई–गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून रत्नागिरी व संगमेश्वर परिसरात वाहतूक ठप्प झाली आहे. सलग सुट्ट्या, पर्यटनाचा वाढलेला ओघ आणि अपूर्ण रस्ते कामांमुळे प्रवाशांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे.
🚨 रत्नागिरी जिल्ह्यात १२ मे पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू; कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाची कडक भूमिका 🚨
रत्नागिरी जिल्ह्यात १२ मे पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहेत.
📰 दुभाजक तोडून कंटेनर दोन पुलांमध्ये अडकला; मोठी दुर्घटना टळली
खेड येथे मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर भरधाव कंटेनरने दुभाजक तोडून दोन पुलांमध्ये अडकून मोठा अपघात घडला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.








