🌍 अमेरिका–इराण तणाव वाढला; समुद्रात अमेरिकेचा अवाढव्य ताफा तैनात
अमेरिकेने इराणविरोधात सागरी नाकेबंदी कडक करत ३१ जहाजांना रोखले असून होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापार ठप्प झाला आहे. या लष्करी कारवाईमुळे जागतिक तेलपुरवठा आणि व्यापारावर मोठा परिणाम होत असून तणाव वाढत आहे.
रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई! ४.८२ लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारे दोन भामटे मुंबईतून जेरबंद
“साखरी बौद्धवाडी येथील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ४ लाख ८२ हजार रुपये चोरणाऱ्या दोन सायबर भामट्यांना रत्नागिरी पोलिसांनी मुंबईतील दहिसरमधून बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.”
कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या पंखांना ‘भविष्यवेध’चे बळ! मुंबईत करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न
मुंबईतील परळ येथे आयोजित ‘भविष्यवेध’ करिअर मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना विविध करिअर संधी, स्पर्धा परीक्षा व आधुनिक शिक्षणाच्या दिशांचे मार्गदर्शन करण्यात आले. पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या उपक्रमातून उज्ज्वल भविष्याची दिशा मिळाली.
🎓 संघर्ष, जिद्द आणि मेहनतीची कमाई: दापोलीतील आदर्श जाधव यांची MBBS पदवी संपादन
दापोलीतील आदर्श सुनील जाधव यांनी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS पदवी संपादन करून परिसराचा अभिमान वाढवला असून त्यांच्या यशामुळे तरुणांना प्रेरणा मिळत आहे.
📰 उमराठमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
उमराठ (ता. गुहागर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत, शाळा नं. १ व कदमवाडी येथील बौद्धविहार येथे प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.
विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली, तर शिक्षकांनी त्यांच्या कार्यावर मार्गदर्शन केले. समता सप्ताहानिमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
स्पर्धेनंतर विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. गावातील नागरिक, शिक्षक व ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीने नगरपंचायत क्षेत्रात अतिदक्षता विभागासह दवाखाना उभारण्याची मागणी
डॉ. निलेश सांबरे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गुहागर ग्रामीण रुग्णालयात जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीने फळवाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी गुहागरमध्ये स्वतंत्र दवाखाना व अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
🚆 मुंबई–रत्नागिरी मार्गावर अधिक गाड्यांची गरज; प्रवाशांची तीव्र मागणी
मुंबई–रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता सध्याच्या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. सणासुदीत प्रचंड गर्दी, वाढती वेटिंग लिस्ट आणि संध्याकाळच्या वेळेत गाड्यांचा अभाव यामुळे नवीन ट्रेन सुरू करण्याची मागणी तीव्र झाली आहे.
🎤 सुप्रसिद्ध गायिका तेजल जाधव यांचा आज वाढदिवस; पत्रकार सुदेश तांबे यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव
”महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका तेजल जाधव हिचा आज वाढदिवस; पत्रकार सुदेश सुरेश तांबे आणि विद्या न्यूज दापोली परिवाराकडून तिला उदंड आयुष्याच्या मंगलमय शुभेच्छा! दापोलीच्या या सुकन्येवर आज सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.”
📰 दापोलीत राजकीय हालचाली मंदावल्या; गुप्त बैठका सुरू
दापोलीत सध्या राजकीय हालचाली मंदावल्या असल्या, तरी पडद्यामागे गुप्त बैठका सुरू असून आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखली जात आहे.
📰 भारतासमोर नवं आव्हान: तेल कुठून आणायचं?
मध्यपूर्वेतील वाढत्या तणाव आणि अमेरिकेने रशिया-इराणवरील तेल निर्बंध पुन्हा लागू केल्यामुळे भारतासमोर ऊर्जा पुरवठ्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे. स्वस्त रशियन तेलाचा पर्याय शोधताना भारत लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेकडे वळण्याची शक्यता आहे.














